टेम्पो कारचा भीषण अपघात, आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
Latur Accident: टेम्पो व कारचा भीषण अपघात झाल्याची घटना, चौघांचा जागीच मृत्यू.
वाढवणा बु. | जि. लातूर: नांदेड-बिदर महामार्गावर एकुर्का रोड येथे टेम्पो व कारचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात आई, दोन विवाहित मुली व एका नातीसह चौघांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला आहे. मृतात मंगलबाई गोविंदराव जाधव (वय ४८ रा. एकुर्का रोड), प्रतिभा संजय भंडे (वय २४ रा. दावणगाव, ता. उदगीर), प्रणिता पांडुरंग बिरादार (वय २६ रा. होनाळी), अन्यया रणजित भंडे (रा. दावणगाव) यांचा समावेश आहे. एकुर्का रोड येथील जाधव कुटुंबिय जावयाची कार (एम.एच. ०२ बी.एम. ४४८२) घेऊन उदगीर येथे खरेदीसाठी जात होते. यावेळी नांदेड-बिदर महामार्गावर उदगीरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या टेम्पो (एम.एच. २४ ए.यू. ४७५६) ने एकुर्का रोडजवळील मारुती मंदीर घाटात कारला समोरुन जोराची धडक दिली. यात कारमधील मंगल गोविंदराव जाधव, ज्योती भंडे, प्रणिता बिरादार आणि नातीचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील अन्य जखमींना उपचारांसाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Web Title: Tempo car tragic accident, two Lekkis including mother, grandson died on the spot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study