Home अहमदनगर चुलत बहिणीकडे लग्नाचा तगादा छेड काढली अन…

चुलत बहिणीकडे लग्नाचा तगादा छेड काढली अन…

Ahmednagar News | Shevgaon:  लग्नाचा हट्ट करत तिला जबरदस्तीने मोटारसायकलवरून बसवून तिची छेड काढल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा.

Teased marriage proposal to cousin Arrested

शेवगाव : अल्पवयीन चुलत बहिणीकडे लग्नाचा हट्ट करत तिला जबरदस्तीने मोटारसायकलवरून बसवून तिची छेड काढल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी व पीडित हे तालुक्यातील एका खेडेगावातील रहिवासी आहेत.

पीडित अल्पवयीन मुलगी येथील एका महाविद्यालयात १२ च्या वर्गात शिक्षण घेते. ती एसटी बसने कॉलेजला येते. सदर मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चुलत भाऊ लग्नासाठी सातत्याने हट्ट करत होता. शनिवारी (दि. ९) सकाळी पीडित मुलगी येथे बसस्थानकावर उतरून कॉलेजमध्ये जात असताना आरोपीने तिला मध्येच अडवून तिचा हात धरत जबरदस्तीने तिला मोटारसायकलवर बसविले व माझ्याशी लग्न कर, असा हट्ट करू लागला. त्यानंतर काही वेळाने त्याने मुलीला कॉलेजजवळ सोडून दिले.

या घटनेबाबत सदर मुलीने तिच्या वडिलांना माहिती दिली  तेव्हा याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक बोकील हे करीत आहेत.

Web Title: Teased marriage proposal to cousin Arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here