Home अहिल्यानगर अहिल्यानगर:  तरुण शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

अहिल्यानगर:  तरुण शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Ahilyanagar Suicide: एका युवा शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला दोराने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Tarun Shetkaryachi commits suicide with a straw

शेवगाव : तालुक्यातील जुने दहिफळ येथील एका युवा शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला दोराने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ५) सकाळच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र, कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची चर्चा त्याच्या निकटवर्तीयांत होती.

शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गोकुळ राम शेळके (वय २१, रा. जुने दहिफळ, ता. शेवगाव), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी पहाटेच काही कामानिमित्त गोकुळ शेतात गेला होता. सकाळी आठच्या सुमारास एका शेतकऱ्याने गोकुळ यास झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहिले. गावकऱ्यांनी पोलिस ठाण्याला या घटनेबाबत कळविले. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून त्याचा मृतदेह शेवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला. गोकुळ हा घरातील कमवता होता. वडील हयात नसल्याने आई, धाकट्या भावाचा तो शेती करून सांभाळ करत होता.

Breaking News: Tarun Shetkaryachi commits suicide with a straw

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here