Home अहमदनगर अहमदनगर: टँकरची दुचाकीला धडक; ग्रामपंचायत सदस्य ठार

अहमदनगर: टँकरची दुचाकीला धडक; ग्रामपंचायत सदस्य ठार

Breaking News | Ahmednagar: दुचाकी व टैंकर यांच्यात भिषण अपघात,  टँकरच्या टायर खाली सापडून साकुरी ग्रामपंचायतचे सदस्य यांचा मृत्यू.

Tanker hits bike Gram Panchayat member killed

राहाताः नगर-मनमाड महामार्गावर मंगळवारी सकाळी दुचाकी व टैंकर यांच्यात भिषण अपघात झाला. टँकरच्या टायर खाली सापडून साकुरी ग्रामपंचायतचे सदस्य विश्वनाथ बनसोडे (वय: ३३) यांचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील भडांगे हॉटेलजवळ घडली.

सचिन योसेफ बनसोडे यांनी राहाता पोलिस ठाण्यात या बाबत फिर्याद दिली आहे. भाऊ विश्वनाथ प्रकाश बनसोडे हा नगर-मनमाड रोडवरून राहाता पोलिस ठाण्याच्या जवळ असलेल्या चहाच्या दुकानाजवळून (एम एच १७ बी ए ६८११) या दुचाकी वरुन जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या (क्रमांक एम एच १७ के ९०४५) या दुधाच्या टैंकरने जोरदार धडक दिल्याने तोल जाऊन विश्वनाथ बनसोडे यांची दुचाकी टँकरच्या चाकाखाली गेले.

टँकरच्या चाकाखाली दुचाकी गेल्याने ते गंभीर जखमी होऊन रोडवर पडले. त्याच्या डोक्याला, पाठीला व पोटाला दुखापत झाली. पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

मंगळवारी सकाळी ११ वाजता शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गर्दीच्या ठिकाणी टँकर व दुचाकीचा अपघात झाल्याचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेऊन तत्काळ रुग्णवाहिकेला संपर्क केला, मात्र पोलिस ठाण्या समोर अपघाताची घटना घडून देखील राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. अपघाताची माहिती मिळूनही पोलिसांनी या ठिकाणी येण्यास उशीर केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Tanker hits bike Gram Panchayat member killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here