Home महाराष्ट्र प्रियकराशी फोनवर बोलायची, आईने टोकलं, मुलीने सुपारी देऊन आईची हत्या

प्रियकराशी फोनवर बोलायची, आईने टोकलं, मुलीने सुपारी देऊन आईची हत्या

Breaking News | Panvel Crime: विवाहित तरुणीने मानलेल्या भावाला सुपारी देऊन जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस.

talk to boyfriend on phone, mother bit her, daughter killed mother by giving betel nuts

पनवेल: येथील परदेशी आळीतील एका विवाहित तरुणीने मानलेल्या भावाला सुपारी देऊन जन्मदात्या आईची हत्या  (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रिया नाईक असे मृत आईचे नाव असून याप्रकरणी मुलगी प्रणिता विवेक पाटील आणि निशांत पांडे या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी रविवारी अटक केली.

बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरास आईकडून निर्बंध घातले जात असल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने तपासात समोर आले आहे. मुलगी प्रणिता ही विवाहित (Married) असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत न पटल्याने ती दोन वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली आहे. या कालावधीत तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते; मात्र काही कारणास्तव ते प्रेमसंबंध (Love Break) तुटले होते. यादरम्यान आई प्रिया यांनी प्रणितावर बाहेर ये-जा करण्यास, फोनवर बोलण्यास बंधने घातली होती. ती बाहेर गेल्यास तिला सतत फोन करणे, मोबाईलची तपासणी करीत होती. आईच्या या निर्बंधांना ती वैतागली होती.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विवेक पाटील हा प्रणिताला बहीण मानत होता. विवेकला पैशांची गरज असल्याने त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. प्रणितालाही आईच्या निर्बंधातून सुटका करून घ्यायची असल्याने तिने विवेकला १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली; मात्र त्याबदल्यात आईची हत्या करण्यास सांगितले. पैशाची गरज असल्याने विवेकने ही ऑफर स्वीकारली. मित्र निशांत पांडे याच्या मदतीने विवेकने १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या केली. रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक हे घरी आले असता प्रिया बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांनी तातडीने प्रिया यांना रुग्णालयात दाखल केले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

शवविच्छेदन अहवालात प्रिया यांची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिस तपासात विवेक आणि निशांत यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे उघड झाले. दोघांची चौकशी केली असता, प्रणिताने दिलेल्या सुपारीनुसार प्रिया यांची हत्या केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी प्रणितालाही अटक केली.

Web Title: talk to boyfriend on phone, mother bit her, daughter killed mother by giving betel nuts

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here