Home संगमनेर संगमनेरात लाचखोर तलाठी व त्याचा दलाल रंगेहात पकडला

संगमनेरात लाचखोर तलाठी व त्याचा दलाल रंगेहात पकडला

Sangamner News: बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्यासाठी तलाठी व त्याच्या दलालास 36 हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना.

Talathi and his broker were caught red-handed accept bribe in Sangamner

संगमनेर: बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्यासाठी तलाठी व त्याच्या दलालास 36 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानक परिसरात घडली. नाशिक येथील पथकाने ही कारवाई केली.

तालुक्यातील चिखली येथील तलाठी धनराज नरसिंग राठोड(रा. इंदिरागल्ली, ता. संगमनेर), त्याचा एजंट योगेश विठ्ठल काशीद (रा. घुलेवाडी फाटा,ता. संगमनेर)या दोघांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. लाचखोर तलाठी राठोड त्याच्या सांगण्यावरून योगेश काशीद याने लाचेची रक्कम स्वीकारली.

तालुक्यातील मंगळापूर परिसरातील जमिनीचा एक प्लॉट खरेदी विक्रीच्या उद्देशाने बिनशेती करून स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्यासाठी तक्रारदार याने चिखली येथील तलाठी कार्यालयात चकरा मारल्या. या कामासाठी चाळीस हजार रुपयांची लाच तलाठ्याकडून मागण्यात आली. ही रक्कम चाळीस छत्तीस हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार याने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली या खात्याच्या पथकाने काल सायंकाळी संगमनेरात येऊन सापळा रचला.

लाचखोर तलाठी व त्याचा एजंट या सापळ्यात जाळ्यात अडकले आहे. तलाठ्याच्या सांगण्यावरून आपण लाच घेतल्याचे एजंटने कबूल केले. या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकामध्ये पोलीस हवालदार सचिन गोसावी अजय गरुड विनोद पवार यांचा समावेश होता.

Web Title: Talathi and his broker were caught red-handed accept bribe in Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here