आंघोळीचे व्हिडियो काढून धमकी देत अत्याचार
Breaking News | Nashik Crime: बांधकामाच्या साइटवर राहणाऱ्या पीडितेचे स्नान करतानाचे व्हिडिओ काढून ते पीडितेला दाखवत गेल्या मार्च ते जून या दरम्यान तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
नाशिक: जुना आडगाव परिसरातील बांधकामाच्या साइटवर राहणाऱ्या पीडितेचे स्नान करतानाचे व्हिडिओ काढून ते पीडितेला दाखवत गेल्या मार्च ते जून या दरम्यान तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयित युवकाविरोधात अॅट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
वसीम रहमतुल्ला अख्तर (२४, सध्या रा. सिता गुंफाजवळ, पंचवटी. मूळ रा. गोपालगंज, बिहार) असे संशयिताचे नाव असून त्यास अटक केली आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयिताने पीडिताचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण केले होते. ते व्हिडिओ पीडितेला दाखवून संशयिताने साइटवर तर कधी शालिमार परिसरातील लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरोधात बलात्कार केला. त्याचेही चित्रण त्याने केले. तसेच, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची व पीडितेचे पती, मुलांना ठार मारण्याची धमकी वारंवार देत तिच्यावर अत्याचार केले. संशयिताने व्हाइस रेकॉर्डिंगही पीडितेच्या व्हॉटसअॅपवर पाठविली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत. संशयिताला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.
Web Title: Taking a video of the bath and threatening to abuse
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study