लॉजवर नेले अन मुलाला मारण्याची धमकी देत विवाहितेवर अति प्रसंग
Breaking News:ओळखीचा फायदा घेत मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर अतिप्रसंग केल्याची घटना.
अहमदनगर: ओळखीचा फायदा घेत मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर अतिप्रसंग केल्याची घटना गुरूवारी (दि. २८) दुपारी कायनेटीक चौकातील एका लॉजवर घडली. याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित विवाहितेने शनिवारी (दि. ३०) दिलेल्या फिर्यादीवरून अमीर हसन शेख (रा. शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीची अमीर शेख सोबत ओळख होती. या ओळखीतून त्याने फिर्यादीला २००८-०९ मध्ये प्रेमासाठी प्रपोझ केला होता. फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला होता. फिर्यादीचा २०१० मध्ये विवाह झाला. त्यानंतर २०२२ पर्यंत अमीर शेख हा फिर्यादीच्या संपर्कात नव्हता. ऑक्टोबर २०२२ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अमीर व फिर्यादी दोघे संपर्कात आले. त्यांच्यात फोनवर बोलणे देखील होत होते. अमीरने फिर्यादीला बुधवारी (दि. २७) फोन करून गुरूवारी (दि. २८) दुपारी नगर शहरातील पुणे बसस्थानक येथे भेटण्याठी बोलावले होते. फिर्यादी त्यांच्या अल्पवयीन (वय ६) मुलाला घेऊन गुरूवारी दुपारी पुणे बस स्थानकावर गेल्या. तेथे अमीर आला व त्यांनी एकत्रित चहा घेतला. कायनेटीक चौकातील लॉजवर घेऊन गेल्या गप्पा मारल्या अन महिला बाथरूम मध्ये गेल्यानंतर तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. त्यावेळी तिने नकार दिला. मात्र त्यानंतर अमीर याने फिर्यादीला जात मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अति प्रसंग केला, त्यावेळी महिला तेथून निघून गेली अन हा प्रकार पतीला सांगितला. त्यामुळे पतीसह पिडीतेने कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Taken to the lodge and threatened to kill the child, violent incident
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News