लोकांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला सल्ला
Supreme Court: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी व लोकांच्या हितासाठी देशात लॉकडाऊन करण्याचा विचार करावा असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्रसरकराला दिला आहे.
रविवारी एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा सल्ला दिला. या सुनावणीत न्यायालयाने म्हंटले आहे की, आम्ही केंद्र आणि राज्यसरकारांना सामुहिक कार्यक्रम व सुपर स्प्रेडर कार्यक्रमांवर बंदी घालण्यासाठी रोख लावण्यासाठी विचार करण्यास सांगू.
कोरोना प्रादुर्भावाचा दुसऱ्या लाटेची परिस्थिती गंभीर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे.
तसेच एखाद्या रुग्णाला स्थानिक पत्ता प्रमाणपत्र किंवा आय डी पुरावा नसल्यास देखील रुग्णालयात भरती करणे आणि आवश्यक औषध देण्यास नाकारले जाऊ शकणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. या धोरणाचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे असेही म्हंटले आहे.
Web Title: Supreme Court advises Modi government