Home महाराष्ट्र धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात

धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात

Suicide Case: 17 वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखम करून आत्महत्या केल्याचे उघड.

Suicide Was playing games at night, next day in room with blood

नागपूर: गेमिंगच्या विखारी प्रभावाने काही वर्षांपूर्वी अनेकांनी ‘ब्लू व्हेल’सारख्या प्राणघातक खेळांमुळे आपले जीवन संपवले होते. आता नागपुरात पुन्हा अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखम करून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. सोमवारी (27 जानेवारी) सकाळी तिच्या आई-वडिलांना ती खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळली. ऑनलाइन गेमिंगच्या टास्कमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट असून आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यावरून काही उलगडे होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपासा दरम्यान असे समोर आले की, पीडित मुलगी उत्तम लिखाण करायची आणि विविध विषयांवर तिच्या भावना व्यक्त करायची. आत्महत्येपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण उघड होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन गेमिंगमुळे उद्भवणारे मानसिक दबाव आणि गेमच्या लेव्हलमध्ये गुरफटून जाणाऱ्या तरुणाईचे भयावह वास्तव पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून, पालकांमध्ये या प्रकारामुळे चिंता वाढली आहे.

नागपुरात एका 17 वर्षाच्या मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली .गळ्यावर जखम करून आत्महत्या केल्याचे घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे .नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे .ऑनलाइन गेमिंग टास्क मुळे तिने हे पाऊल उचलले असल्याचा संशय व्यक्त होत आहे .आत्महत्या करण्यामागे नेमकं काय घडलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही .मात्र तरुणी रात्री ऑनलाईन गेम खेळत होती .सोमवारी सकाळी ( 27 जानेवारी) आई वडील उठल्यावर मुलगी तिच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात दिसून आली. आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती . आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे .या चिठ्ठीतून आणखी काही उलगडे होण्याची शक्यता असून या घटनेचा अधिक तपास धंतोली पोलीस करत आहेत .

Web Title: Suicide Was playing games at night, next day in room with blood

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here