Home अहिल्यानगर अहमदनगर: अल्पवयीन तरुणीची राहत्या घरात आत्महत्या

अहमदनगर: अल्पवयीन तरुणीची राहत्या घरात आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: राहत्या घरात गळफास घेऊन अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना.

Suicide of minor girl in residential house

अहमदनगर: राहत्या घरात गळफास घेऊन अल्पवयीन मुलीने आत्महत्या  केल्याची घटना सोमवारी रात्री केडगाव उपनगरातील शाहुनगर, पाचगोडाऊन जवळ घडली. प्रांजल आनंद बराटे (वय 16) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रांजल बराटे हिने तिच्या राहत्या घरात गळफास घेतल्याचा प्रकार सोमवारी रात्री तिच्या नातेवाईकांच्या लक्ष्यात आला. तिला उपचारासाठी तिचे वडील आनंद बराटे यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात साडेआठ वाजता नेले. दरम्यान उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषीत केले. याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. खेडकर यांनी रूग्णालयात नेमणूकीस असलेले तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जी. जी. बोरूडे यांना दिली.

अंमलदार बोरूडे यांच्या खबरीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री पावणे दहा वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान प्रांजलने आत्महत्या का केली याची माहिती समोर आली नाही. पुढील तपास पोलीस अंमलदार आनंद वाणी करत आहेत.

Web Title: Suicide of minor girl in residential house

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here