संगमनेरात वैद्यकीय महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या
Sangamner news: महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आपल्या राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
संगमनेर: महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आपल्या राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची सायंकाळी घटना सहा काल वाजेच्या सुमारास शहरातील नवीन नगर रोड परिसरात घडली. टिंकल उदय सोनवणे ( वय २३, राहणार, नाशिक ) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
सदर महाविद्यालयाने युवती ही शहरातील नवीन नगर रस्त्यावरील बीएचएमएस कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती. ती शहरांमधील नवीन नगर रोड परिसरातील एका खोलीमध्ये आपल्या तीन मैत्रिणीसह राहत होती. काल दुपारी तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेबाबत बाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. विद्यार्थिनी अतिशय हुशार होती. सदर तिचा प्रथम क्रमांक यायचा. ती अखेरच्या वर्षात शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या केल्याने महाविद्यालयात हळहळ “व्यक्त करण्यात आली. महाविद्यालयीन प्रशासनाने सदर विद्यार्थिनीच्या वडिलांना ही माहिती कळवली. घटनेची माहिती समजताच तिचे वडील कुटुंबासह संगमनेर येथे आले. मुलीने गळफास घेतल्याचे त्यांना समजले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. आत्महत्या मागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
Web Title: Suicide of Medical College Girl in Sangamner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App