Home संगमनेर संगमनेर: लग्नाच्या चार महिन्यातच नवविवाहितेची आत्महत्या

संगमनेर: लग्नाच्या चार महिन्यातच नवविवाहितेची आत्महत्या

Breaking News | Sangamner: लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच सासरच्या त्रासाला कंटाळून पुणे येथे इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या.

Suicide of a newlywed within four months of marriage

संगमनेर: तालुक्यातील झरेकाठी येथील मूळच्या रहिवासी असणाऱ्या व सध्या नोकरी निमित्ताने पिंपरी चिंचवड मधील पुनावळे-रावत येथे राहत असलेल्या अंकिता प्रतीक वाणी (वय २३) या विवाहितेने लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच सासरच्या त्रासाला कंटाळून पुणे येथे इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील जोर्वे येथील हौशीराम लहानू दिघे यांची मुलगी अंकिता हिचा झरेकाठी येथील प्रतीक वाणी याच्याबरोबर १८ एप्रिल २०२४ रोजी विवाह झाला होता. प्रतीक आणि त्याचे वडील गंगाधर वाणी यांनी हौशीराम दिघे यांच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी केली होती. लग्राच्या वेळी दिघे यांनी पाच तोळे सोने दिले होते; मात्र त्यांची आर्थिक अडचण असल्यामुळे लग्न झाल्यानंतर ४ लाख रुपये देतो असे सांगितले होते. तरीसुद्धा अंकिता हिचा पती प्रतीक, सासरा गंगाधर आणि सासू अल्पना वाणी हे सर्वच जण तिचा सासरी शारीरिक व मानसिक छळ करत होते. या सासरच्या होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली, असे अंकिताचे वडील हौशीराम दिघे यांनी पिंपरी चिंचवडमधील रावत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी मयत अंकिताचा पती प्रतीक गंगाधर वाणी, सासरा गंगाधर वाणी आणि सासू अल्पना वाणी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, तिचा पती प्रतीक आणि सासरा गंगाधर यास रावत पोलिसांनी झरेकाठी येथे येऊन अटक केली.

Web Title: Suicide of a newlywed within four months of marriage

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here