अहमदनगर: मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
Ahmednagar Suicide News: बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या जामखेड येथील घटना, कारण गुलदस्त्यात.
जामखेड : रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजला बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जामखेड शहरात घडली. हा प्रकार गुरुवारी (दि.५) लक्षात आला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला.
डिंपल पाटील (वय २२, रा. नागपूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथील मुकुंद जवकर यांच्या इमारतीत इतर मुलींसोबत तिसऱ्या मजल्यावर डिंपल राहत होती. तिने मागील आठवड्यात बीएचएमएसचे तिसऱ्या वर्षाच्यापरीक्षेचे पेपर दिले होते. मुलीच्या आईने डिंपलला फोन केला. परंतु, ती फोन घेत नव्हती. त्यामुळे डिंपल हिच्या रूममध्ये राहणाऱ्या इतर मुलींशी संपर्क केला. तेव्हा हा प्रकार लक्षात आला. तत्काळ जामखेड पोलिस ठाण्यात संपर्क केला. पोलिसांनी मयत मुलीच्या नातेवाइकांना फोन केला.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
मयत मुलीची आई व इतर नातेवाईक नागपूर येथून जामखेडकडे निघाले असून ते आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती समजताच मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे तातडीने घटनास्थळी पोहोचले.
Web Title: Suicide of a medical college student
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App