सातवीच्या विद्यार्थ्याने संपविले जीवन
Breaking News: सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने रहात्या घरा शेजारी असलेल्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
केज : इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने रहात्या घरा शेजारी असलेल्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपक ( दिप) सचिन अकलूजकर ( वय १४ वर्ष) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
मुळचा बार्शी येथील असलेल्या दिपकचे वडील सचिन अकलूजकर यांचे कोरोना काळात निधन झालेले होते. यानंतर आईनेही दुसरं लग्न केलं. यानंतर एकटा पडलेल्या दिपक याला त्याच्या आत्याने चिंचोलीमाळी येथे आणले होते.
येथे त्यास शाळेत प्रवेश देऊन सांभाळ करत होत्या. गुरुवारी (दि. २१) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आत्याच्या रहात्या घरा शेजारी असलेल्या गोठ्यात दिपक ( दिप) अकलूजकर याने आडूला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयताचे मामा यांनी दिलेल्या खबरीवरुन केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक हा शाळेतील हुशार व मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा होता. यामुळे ही घटना समजताच गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. केज पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Suicide Case student of class VII ended his life
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study