अहमदनगर: इस्त्रीचा शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू
Ahmednagar: इस्त्री करत असताना विजेचा शॉक (Electric Shock) लागून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
श्रीरामपूर: कपड्याला इस्त्री करत असताना विजेचा शॉक लागून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेलापूर येथे घडली. विशाल भगीरथ पिटेकर (वय १५) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
बेलापूर पोलिस स्टेशनसमोर विशाल पिटेकर या शाळकरी मुलाचे घर आहे. शुक्रवार दि. २५ रोजी रात्रीच्या सुमारास कपड्यास इस्त्री करत असताना विशाल यास इस्त्रीचा जबरी शॉक लागला. घरातील इतर लोकांनी विजेचे बटन बंद करून त्यास दवाखान्यात नेले. परंतु, तत्पूर्वीच विशाल मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तो येथील जे. टी. एसच्या विद्यालयात इयत्ता ९ वीत शिक्षण घेत होता.
Web Title: Student dies due to electricc shock
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App