Home महाराष्ट्र दहावीत कमी गुण मिळतील या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या, मिळाले ८१ टक्के

दहावीत कमी गुण मिळतील या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या, मिळाले ८१ टक्के

Student commits suicide for fear of getting less than 10 marks

सोलापूर: १० वीच्या परीक्षेत कमी गुण पडतील या भीतीने माढा तालुक्यात घोटी येथे एका विद्यार्थिनीने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली मात्र निकाल जाहीर झाला असून तिला ८१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

अमृता दाजीराम लोंढे वय १७ रा. घोटी त. माढा असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.  १७ जून २०२२ रोजी ही घटना उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमृता लोंढे  हिने एप्रिल २०२२ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत तिला अपेक्षेप्रमाणे गुण मिळतील का नाही याबाबत तिला मनात संशय होत. यामुळे ती तणावाखाली होती. कमी गुण मिळाल्यास लोक काय म्हणतील या भीतीने वावरत होती. ही बाब तिच्या आई वडिलानाही जाणवत होती. मात्या पित्याने तिला समजविण्याचा प्रयत्न देखील केला होता.  मात्र उपयोग झाला नाही. गुरुवारी मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास ती कुणालाही काही ना सांगता ती घराबाहेर पडली. घरात ती दिसत नसल्याने सर्वत्र तिचा शोध घेतला मात्र कोठेही दिसून आली नाही. शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घरापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतातील शेततळ्यात पाण्यावर तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Student commits suicide for fear of getting less than 10th  marks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here