Home संगमनेर संगमनेर: उड्डाणपुलावरून अज्ञातांची दगडफेक, विद्यार्थीनी जखमी

संगमनेर: उड्डाणपुलावरून अज्ञातांची दगडफेक, विद्यार्थीनी जखमी

Breaking News | Sangamner: विद्यार्थिनींवर अज्ञाताने उड्डाणपुलावरील बोगद्यातून अज्ञात इसमांनी मोठा दगड फेकला. यात दोन विद्यार्थिनी जखमी.

Stones pelted by unknown persons from flyover, students injured

संगमनेर:  संगमनेर पायी शाळेत जात असलेल्या, विद्यार्थिनींवर अज्ञाताने उड्डाणपुलावरील बोगद्यातून अज्ञात इसमांनी मोठा दगड फेकला. यात दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. यातील एका विद्यार्थिनीच्या डोक्यांला गंभीर दुखापत झाली असून दुसऱ्या विद्यार्थिनीच्या पायाला दगड लागला. ही घटना सोमवारी (दि. १५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिक- पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला शिवारात घडली.

यापूर्वीही असे प्रकार अनेक वेळा घडल्याने संतप्त झालेले कासारा दुमाला ग्रामस्थ बाह्यवळण महामार्गावर उतरत आपला संताप व्यक्त केला. आस्था शिवकुमार श्रीवास (इयत्ता नववी), श्रुती गणेश धुमाळ (इयत्ता चौथी) अशी जखमी झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. आस्था श्रीवास हिच्या डोक्यात दगड पडल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली असून तीला आठ टाके पडले आहे. श्रीवास आणि धुमाळ हे दोन्ही कुटुंबीय कासारा दुमाला गावच्या हद्दीत शेजारी शेजारी राहावयास आहेत. त्यांच्या मुली काशेश्वर विद्यालयात शिक्षण घेतात, त्या दोघी शाळेत जात असताना त्या उड्डाणपुलाखाली आल्या. त्यावेळी अज्ञाताने नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर बोगद्यातून उड्डाणपुलावरून मोठा दगड फेकला. हा दगड आस्था श्रीवास हिच्या डोक्यात पडून श्रुती धुमाळ हिच्या पायावर पडला. यात या विद्यार्थिनी जखमी झाल्याचे काही स्थानिकांनी पाहिल्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. उड्डाणपुलाच्या बोगद्यातूनच दगड फेकले जातात. विद्यार्थिनींना लक्ष्य केले जाते. यापूर्वी १३ डिसेंबर २०२३ ला सकाळी १०.३५ ला दगड फेकला गेला, त्यात गार्गी गोकूळ कश्यप हिच्या पायाला दगड लागला होता. १८ डिसेंबर २०२३ अनुष्का प्रदीप भालेराव या विद्यार्थिनीच्या डोक्यात दगड पडून ती जखमी झाली होती. उड्डाणपुलावरील बोगदा असलेली जागा बंदिस्त करावी, या संदभनि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले होते. मात्र, कुठलीही दखल न घेता त्यांनी बोगदा बंदिस्त न केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तातडीने कार्यवाही न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा काशेश्वर विद्यालय कासारा दुमालाचे शिक्षक तसेच ज्ञानेश्वर वाळे, धनंजय ढोले, रोहिदास गवांदे, मंगल गोडगे, रेखा गाडे, दिपक अनाप, सुनंदा बोन्हाडे, उमेश काळे, स्वप्निल पारधी यासह ग्रामस्थांनी दिला आहे. कासार दुमाला गावच्या हद्दीत घडलेली घटना गंभीर आहे. तसेच यापूर्वी महामार्गावर वाहनांचे अपघात घडले, त्या बाहनांतील माल उड्डाणपुलावरील बोगद्यांतून खाली नागरिकांच्या अंगावर पडल्याने ते जखमी झाले होते. मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यात ज्या महामार्गावर उड्डाणपूल आहेत, तेथे बोगदे असलेल्या जागा पूर्णपणे बंदिस्त करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Web Title: Stones pelted by unknown persons from flyover, students injured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here