विकृतीचा कळस! पोटच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार
Mumbai Crime: एका नराधम बापाने विकृतीचा कळस गाठत आपल्या लेकीवर अत्याचार (abused) केल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरामधून बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका नराधम बापाने विकृतीचा कळस गाठत आपल्या लेकीवर अत्याचार केले आहेत. आरोपीनं 15 वर्षांच्या पोटच्या मुलीला चाकुचा धाक दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. मागील अनेक दिवसांपासून आरोपी बाप आपल्या मुलीचे शोषण करत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, 47 वर्षीय आरोपी बापाने मागील वर्षी डिसेंबरमध्ये चाकूचा धाक दाखवत आपल्या 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारेन, अशी धमकी बापाने मुलीला दिली होती. बापाच्या धमकीला घाबरून पीडित मुलीनं घटनेची माहिती कुणालाच दिली नाही. यानंतर आरोपीची पुन्हा हिंमत वाढली. त्याने अशाच प्रकारे अनेकदा पोटच्या लेकीला आपल्या वासनेचे शिकार बनवले. घरात कोणी नसल्याचा फायदा उचलत तो आपल्या लेकीवर अत्याचार करत होता. कसा उघडकीस आला गुन्हा? नराधम वडिलांच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं घटनेची माहिती आपल्या आईला दिली. मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती मिळताच पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर तिने तातडीने वडाळा टीटी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्याच पतीविरोधात फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत आरोपी वडिलांवर पोक्सोसह, चाकुचा धाक दाखवून जीवे धमकी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Stolen girl assaulted with knife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News