Home अहमदनगर भरधाव ट्रकने ६ वाहनांना उडविले; २० जण जखमी

भरधाव ट्रकने ६ वाहनांना उडविले; २० जण जखमी

Breaking News | Ahmednagar: घाटातील तीव्र उतारावरून भरधाव जाणाऱ्या ट्रकने सहा वाहनांना उडविले , पांढरीपूल घाटातील उतारावरील दुर्घटना.

Speeding truck overturns 6 vehicles 20 people injured

अहमदनगर | सोनई: छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावर पांढरीपूल (ता. नेवासा) घाटातील तीव्र उतारावरून भरधाव जाणाऱ्या ट्रकने सहा वाहनांना उडविले. अपघातात २० जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. २९) घडली.

पांढरीपूल घाटातील तीव्र उतारावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच १६ सीसी ४३४३) पांढरी पूल येथे समोर जात असलेल्या चार कार, एक मालवाहतूक टेम्पो व एक दुचाकीस धडक दिली. सायंकाळी सहाच्या सुमारास पांढरीपूल परिसरात वर्दळ असते. त्याचवेळी हा अपघात झाल्याने

जखमींची संख्या जास्त आहे. भरधाव जाणाऱ्या ट्रकने उडविलेल्या वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. वाहन कोणत्या कंपनीचे आहे हे ओळखणेही अवघड झाले.

अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र जखमींचा आरडाओरडा सुरू होता. त्यामुळे गोंधळ उडाला होता. धडक एवढ्या जोराची होती की दोन कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने फेकल्या गेल्या. अपघातात सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात काही गंभीर जखमी झाले आहेत, तर काहींना किरकोळ मार लागला आहे. तीव्र उतारावर घाटातील

ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक दोन किलोमीटर अंतरावरील हॉटेलवर पार्किंग करून फरार झाला. घटनास्थळी सोनई पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींवर नगर येथील खासगी तसेच काहींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिक तरुणांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

Web Title: Speeding truck overturns 6 vehicles 20 people injured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here