Home अहमदनगर तलवार, कोयते, लोखंडी रॉडने मारहाण करत खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

तलवार, कोयते, लोखंडी रॉडने मारहाण करत खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Ahmednagar News: गळनिंब येथील मागील भांडणाच्या कारणावरुन तलवार, कोयते, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करत खून प्रकरणी एकास अटक. (Arrested).

smile of the accused who killed by beating 

नेवासा: नेवासा तालुक्यातील गळनिंब येथील खून प्रकरणी एकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शरद कुंडलिक ढोकणे (वय ४३, रा. गोपाळपूर, ता. नेवासा) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणी डहाळे यांचे मित्र प्रमोद संभाजी कापसे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार नेवासा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९ सह आर्म अॅक्ट कायदा ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

गळनिंब येथे शेखर अशोक सतकर, माऊली उर्फ अरुण दत्तात्रय गणगे, अशोक उर्फ खंडू किसन सतकर (सर्व रा. सुरेगाव, ता. नेवासा), दीपक सावंत, ईश्वर पठारे (रा. वरखेड), जालिंदर बोरुटे याच्यासह अन्य तीन इसमांनी मागील भांडणाच्या कारणावरुन तलवार, कोयते, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करत प्रविण मधुकर डहाळे यांना जीवे ठार मारले.

सदरील गुन्ह्यातील आरोपी शरद कुंडलिक ढोकणे हा माळीचिंचोरा परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. पोलिसांच्या सापळ्यात शरद कुंडलिक ढोकणे याला जेरबंद करण्यात आले.

त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला नेवासा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, सपोनि. हेमंत थोरात, सफौ. भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, पोना. रविंद्र कर्डिले, संदीप दरंदले, फुरकान शेख, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: smile of the accused who killed by beating 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here