Home अहमदनगर अहमदनगर: कत्तलखाण्याचे केंद्र,  गोरक्षकावर गोळीबार

अहमदनगर: कत्तलखाण्याचे केंद्र,  गोरक्षकावर गोळीबार

Slaughterhouse, firing on cow guard

Slaughterhouse, firing on cow guard

कोल्हार: श्रीरामपूर तालुक्यातील ममदापुर कत्तलखाण्याचे केंद्र बनले आहे. बुधवारी शिर्डी, श्रीरामपूर, लोणी पोलीस व प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी येथे छापा टाकला असता कत्तलीसाठी आणलेल्या गायी आढळल्या. येथे धाड टाकताच येथील सराईत गुन्हेगारांनी गोरक्षकावर गोळीबार केला. त्यांच्या वाहनांची मोडतोड करून धारदार शस्त्राने वार देखील केले. यात एक जण गंभीर जखमी असून त्यास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लोणी पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला असून ५ जणांना अटक केली आहे.

साईराज बेंद्रे हा युवक आरोपींच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. नियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी, अरबाज कुरेशी, साजिद कुरेशी, नजीम कुरेशी, समीर कुरेशी, जतीफ कुरेशी, मुनिर कुरेशी, अजीम शहा, शकिर शहा, इम्रान शेख, अन्सार शेख, नजीर शेख, मुदतसर शेख, हुसेन शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नांवे आहेत. यातील पाच जणांना लोणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिर्यादी अप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे (रा. तांदुळनेर ता. राहुरी) यांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी सहा तारखेस लोणीच्या बाजारातून काही गायी कत्तलीसाठी ममदापुर येथे नेत असल्याची बाब गोरक्षकांच्या नजरेस आली. याबाबत त्यांनी लोणी पोलिसात माहिती देत त्यांचे सोबत सांयकाळी ६ वाजता गेले. ममदापुर येथील कसाई मोहल्ल्या जवळ गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असलेली जागा पोलिसांना दाखविली. याचाच राग येऊन आरोपींनी गोरक्षकांवर तलवार, कोयते व काठ्यांनी सशस्त्र हल्ला केला. परिस्थिती बिघडून जमाव उग्र झाल्याने सोबत असलेल्या पोलिसांनी गोरक्षकांना मात्र यामध्ये साईराज बेंद्रे गंभीर जखमी झाला त्यास अतिदक्षता विभागात हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी आरोपींनी गोरक्षकाच्या दिशेने फायरिंग करून दहशत निर्माण केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

घटनेनंतर लोणी, शिर्डी व श्रीरामपूर पोलिसांनी येथे कारवाई करून पाच आरोपींना ताब्यात घेतले. शिर्डीचे डीवायएसपी संदीप मिटके, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, लोणीचे सपोनि युवराज आठरे, पीएसआय योगेश शिंदे, पीएसआय चव्हाण लोणीचे पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली. वरील १६ आरोपींविरुद्ध भादवी कलम ३०७, ३२३, ३२४, ४२७, ५०६, १४३, १४७, १४८, १४९, ४, २५, (३७) ३५ प्रमाणे लोणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एपीआय युवराज आठरे करीत आहेत.

Web Title: Slaughterhouse, firing on cow guard

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here