अहमदनगर: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड परिसरात लक्ष्मीनारायण नगर येथे राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे.
कीर्ती आदिनाथ मोढे (वय 19) असे या आत्महत्या केलेल्या तरुण विद्यार्थिनीचे नाव आहे.
शहरातील गोंधवणी रोड परिसरातील लक्ष्मीनारायण नगर भागात राहणार्या कीर्ती आदिनाथ मोढे (वय 19) या विद्यार्थिनीने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र जगधने यांनी पोलिसांना माहिती दिली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पंडित करीत आहेत.
Web Title: Shrirampur Young woman commits suicide by strangulation