लग्नानंतर काही दिवसांतच तरुणी गरोदर, धक्कादायक खुलासा पित्यानेच केला बलात्कार
मुंबईः | Rape Case: साकीनाका परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या मुलीवर दोन वर्षे बलात्कार (Rape) करून पित्याने तिचे लग्न लावून प्रकार समोर आला आहे. २२ वर्षीय मुलीच्या लग्नानंतर ती गरोदर असल्याचे लक्षात आल्यावर सासरच्या मंडळीनी वैद्यकीय सल्ला घटल्याने गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. हा सर्व प्रकार पित्याने केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. तिचे वडील हे रिक्षाचालक आहे. आईलाही सर्व माहित असताना साथ देणाऱ्या आई विरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे.
साकीनाका परिसरात राहणाऱ्या पिडीत मुलीवर तिचे वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abusing) करत होते. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी त्याने मुलीला दिली होती. याबाबत सुरुवातीला आईला काहीच कल्पना नव्हती, मात्र काही महिन्यांपूर्वी मुलीच्या पोटात खूप दुखत असल्याने तिला डॉक्टरकडे नेले असता ती गरोदर असल्याचे समजले. आईने याबाबत विचारताच तिने वडिलांनी हे कृत्य केल्याचे सांगितले. बदनामी होण्याच्या भीतीने आईनेही तिला शांत राहण्यास सांगितले. ती बाहेर कुणाला सांगेल यासाठी तिला चटके देऊन घाबरविण्यात येत होते. गर्भपात व्हावा यासाठी मुलीस गोळ्याही दिल्या जात होत्या. मात्र तसे न झाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी एका तरुणाशी तिचे लग्न लावून दिले.
लग्नानंतर ही मुलगी सासरी गेल्यावर त्रास जाणवत होता.. पोटदुखी, अंगदुखीमुळे पतीने तिला डॉक्टरकडे नेले असता तपासणीमध्ये ती गरोदर असल्याचे समोर आले. मात्र गरोदर कालावधी लग्नाच्या आधीपासूनचा असल्याचे लक्षात आले. याबाबत पतीने विचारणा केली असता आपल्या पित्याची कृत्य उघड झाली. पतीने तिच्यासोबत जाऊन याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिच्या वडिलांना अटक केली आहे.
Web Title: shocking Rape was made by the father himself