नव्या वर्षात वीज दरवाढीचा ‘शॉक’ घरगुती वीज बिल २५ ते ४५ रुपयांनी वाढणार
Breaking News: नव्या वर्षात घरगुती वीज ग्राहकांवर दरमहा १० ते ६५ रुपयांचा वीज दरवाढीचा बोजा वाढणार.
मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागतात राज्यातील जनता मग्न असताना राज्य सरकारने राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा ‘शॉक’ दिला आहे. नव्या वर्षात घरगुती वीज ग्राहकांवर दरमहा १० ते ६५ रुपयांचा वीज दरवाढीचा बोजा वाढणार आहे.
राज्यातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय वीज ग्राहकांसाठी ही दरवाढ दरमहा २५ ते ४५ रुपये असणार आहे. शेती पंपासाठी ही दरवाढ २० ते ३० पैसे प्रतियुनिट असणार आहे. उच्च दाब श्रेणीतील औद्योगिक ग्राहकांसाठी ही दरवाढ ३५ पैसे प्रतियुनिट तर व्यावसायिक ग्राहकांना ५५ पैसे असणार आहे.
गृहनिर्माण सोसायटीच्या वीज बिलांमध्ये ३० पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे. कोळसा खरेदीसाठी अपेक्षित खचपिक्षा अधिक खर्च येत असल्याने इंधन समायोजन शुल्क या शीर्षकाखाली ही दरवाढ करण्यात येत आहे, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले. इंधन खरेदीसाठी दरमहा ३८६ कोटी अधिक खर्च येत असल्याने या खर्चाची भरपाई वीज बिल वाढवून करण्याचा प्रस्ताव महावितरणतर्फे राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिल्याने डिसेंबर महिन्याच्या वीज बिलापासूनच ही दरवाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे. इंधन अधिभार वाढीच्या नावाखाली ही दरवाढ राज्यातील वीज ग्राहकांवर लादली जात आहे. एप्रिल महिन्यातच नवे वीज दर लागू केले होते. राज्य वीज २८ डिसेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता या दरवाढीत इंधन अधिभारामुळे होणाऱ्या दरवाढीची भर घातली जाईल.
Web Title: shock’ of electricity price hike in the new year will increase household electricity bills by Rs 25 to 45
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News