Home महाराष्ट्र अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण; दोघांना अटक

अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण; दोघांना अटक

Breaking News | Satara Crime: अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस.

Sexual abuse of an eleven-year-old boy Both were arrested

कहऱ्हाड | सातारा: अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कन्हाड शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे, तर दोन संशयित अल्पवयीन आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना कहऱ्हाडनजीकच्या उपनगरात घडली.

पीडित मुलगा ८ सप्टेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास परिसरातील एका मंडळाजवळ खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी प्रसाद कुलकर्णी, ओम डुबल यांच्यासह अन्य दोन अल्पवयीन मुलांनी त्याला नजीकच्या हॉलमध्ये नेले. त्या ठिकाणी त्यांनी त्याला मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखविल्या. तसेच त्याचे लैंगिक शोषण केले. या कृत्याचे त्यांनी मोबाइलवर व्हिडीओ चित्रीकरणही केले. कुटुंबीयांनी याबाबत कहऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ओम संजय डुबल (वय १९) व प्रसाद महेश कुलकर्णी (१९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पीडित मुलाच्या नातेवाइक महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Sexual abuse of an eleven-year-old boy Both were arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here