Home नागपूर हॉटेलमध्ये तीन तरुणी, आळीपाळीने लोक यायचे अन् मग… धक्कादायक घटना

हॉटेलमध्ये तीन तरुणी, आळीपाळीने लोक यायचे अन् मग… धक्कादायक घटना

Breaking News | Nagpur Sex Racket: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत तीन मुलींना सुरक्षित वाचवले आहेत. शहरातील एका शांत निवासी भागातील प्रमिला प्रकाश हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर हा धक्कादायक घटना समोर आली.

sex racket in a residential area 3 girls and arresting 2 suspects

नागपुर: नागपुरात पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत तीन मुलींना सुरक्षित वाचवले आहेत. शहरातील एका शांत निवासी भागातील प्रमिला प्रकाश हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर हा धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी ऑपरेशन शक्ती मोहीमेतर्गंत ही कारवाई करत तीन मुलींना सुरक्षितपणे वाचविण्यात आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेक्स रॅकेटमध्ये मुलींना पैशाचे आमिष दाखवून फसवण्यात आले होते. या रॅकेटचा मास्टरमॅन तरुणींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत होता. त्यानंतर या मुलींकडून तो देहविक्री करुन घेत होता. पोलिसांनी या सेक्स रॅकेटमध्ये दोन मुख्य आरोपींनी गजाआड केलं आहे. या आरोपींचं नाव कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला असं आहे. या आरोपींना पोलिसांनी हॉटेलमधून अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिसांना त्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या प्रकरणाचा भांडाफोड केला. बनावट ग्राहक हॉटेलमध्ये गेल्यावर त्याने तिथल्या लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यावेळी या हॉटेलमधील कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला या दोघांनी चालवलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यानंतर बनावट ग्राहकांनी पोलिसांनी त्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी हॉटेलवर छापा मारला.

नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने माहिती दिली की, ऑपरेशन शक्ती मोहीमेतर्गंत ही कारवाई करण्यात आली असून गेल्या काही महिन्यांपासून शहरात मानव तस्करी आणि सेक्स रॅकेटविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. या छाप्यात हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि इतर पुरावेही पोलिसांनी जप्त करण्यात आले आहेत.

Breaking News:  sex racket in a residential area 3 girls and arresting 2 suspects

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here