तलाठी कार्यालयात सात वर्षीय बालिकेचा विनयभंग
Jalgaon Crime: तलाठी कार्यालयातील एका शिपायाने सात वर्षीय बालिकेचा विनयभंग (Molested) केल्याची घटना.
जळगाव: तलाठी कार्यालयातील एका शिपायाने सात वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना जळगाव खुर्द गावातून समोर आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, जळगाव खुर्द येथील सात वर्षीय मुलगी आपल्या आजीसह वास्तव्याला आहे. १० जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आजी बालिकेसोबत जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयात आल्या होत्या. तलाठी कार्यालयात तलाठी नसल्यामुळे आजी नातीसोबत थोडा वेळ थांबल्या.
नंतर मुलीला तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी बाहेर गेल्या असता तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्या (पूर्ण नाव माहीत नाही) याने मुलीचा विनयभंग केला. मुलगी रडत रडत आजीकडे गेल्यावर तिने हा प्रकार सांगितला. कुटुंबीयांत प्रकरण समजल्यावर ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आजीने दिलेल्या तक्रारीवरून तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.
Web Title: seven-year-old girl was molested in Talathi office