वीज पडून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश
राज्यात ठिकठिकाणी वीज पडून सात जणांचा मृत्यू (Died) झाला.
चंद्रपूर/यवतमाळ / लातूर/पुणे: विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात काही ठिकाणी बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी ठिकठिकाणी वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. याशिवाय पशुधनाचेही नुकसान झाले.
चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून तीन जण ठार झाले. जिवती तालुक्यातील चिखली परिसरात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. वंदना चंदू झाला. कोटनाके (३५) व भारुला अनिल कोरांगे (३२) अशी मृतक महिलांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी शेतीची कामे आटोपून त्या घरी परतत होत्या. तसेच, जिवती तालुक्यातीलच मराई पुणे जिल्ह्यातील सादलगाव (ता. शिरूर) येथे बुधवारी दुपारी वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. रिता सीताराम नाईक (मूळ रा. आडशी, जि. नंदुरबार), असे मृत तरुणीचे नाव आहे. तरुणीची विवाहित बहीण गीता राजेश वळवी ही जखमी झाली आहे.
पाटण येथील एका इसमाचाही वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, त्याचे नाव कळू शकले नाही. भद्रावती तालुक्यातील राळेगाव शिवारात वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून बुधवारी दोघांचा मृत्यू झाला. यात एका शेतकरी महिलेचा समावेश आहे. यवतमाळ तालुक्यातील वडनेर येथे वीज कोसळून गीता माणिक राठोड (४०) या महिलेचा मृत्यू झाला. तर झरीजामणी तालुक्यातील कारेगाव शिवारात लखू रामू धुर्वे (४०) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून ते जागीच ठार झाले. लातूर जिल्ह्यात लांबोटा (ता. निलंगा) येथे उषाबाई लक्ष्मण आवटे (४५) या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. त्या म्हैस घेऊन गावाकडे येत होत्या. तसेच कलांडी येथे व्यंकट राम सूर्यवंशी यांचा बैल वीज पडल्याने ठार झाला आहे.
Web Title: Seven people died due to lightning