Home अहमदनगर अहमदनगर: बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार

अहमदनगर: बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार

Breaking News | Ahmednagar:  शेतकर्‍याच्या मालकीच्या गोठ्यामध्ये असलेल्या दहा ते बारा शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला.

Seven goats killed in leopard attack

पारनेर:  तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख या शेतकर्‍याच्या मालकीच्या गोठ्यामध्ये असलेल्या दहा ते बारा शेळ्यांवर सोमवारी (दि. 16) पहाटेच्या वेळी बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या. काही शेळ्या जखमी झाल्या असून सात शेळ्यांचा बिबट्यांनी फडशा पाडल्यामुळे हल्ला करणारे दोन ते तीन बिबटे असण्याची शक्यता आहे.

बिबट्यांनी शेळ्यांवरती हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात अनेक बिबटे असण्याची शक्यता आहे. बिबट्यांचे प्रमाण पठार भागावर आणि पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये मोठे आहे. याठिकाणी अनेक वेळा शेतकर्‍यांना व ग्रामस्थांना बिबटे दिसत आहेत. गारगुंडी येथील शेख यांच्या शेळ्यांच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या.

Web Title: Seven goats killed in leopard attack

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here