Home अहमदनगर अहमदनगर: शालेय बस खड्ड्यात; वीस विद्यार्थी बचावले

अहमदनगर: शालेय बस खड्ड्यात; वीस विद्यार्थी बचावले

Breaking News | Ahmednagar: अरूंद रस्त्याने जाणारी शालेय वस रस्त्याकडेला घसरून पलटी होता होता राहिली. सुदैवाने बसमधील वीस विद्यार्थी थोडक्यात बचावले.

School bus in pit Twenty students survived

श्रीरामपूर :  जवाहरवाडी-बेलापूर अरूंद रस्त्याने जाणारी शालेय वस रस्त्याकडेला घसरून पलटी होता होता राहिली. सुदैवाने बसमधील वीस विद्यार्थी थोडक्यात बचावले. बसचे किरकोळ नुकसान झाले आहे.

डहाणूकर इंग्रजी शाळेचे विद्यार्थी घरी सोडविण्यासाठी ही बस जात होती. टिळकनगर डहाणूकर इंग्रजी शाळा दुपारी तीनच्या सुमारास सुटली. टिळकनगर येथून शालेय विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी बस निघाली. जवाहरवाडी रस्त्यावर समोरून रिक्षा आल्याने चालकाने बस डावीकडे दाबली. पावसामुळे बसचा टायर खाली घसरला अन् ती खड्ड्यात कलंडली. बस कलडत असल्याने विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. बस डावीकडून खड्ड्यात उतरल्याने विद्यार्थ्यांना दरवाज्यातून उतरता येत नव्हते. चालकाने मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाज्यातून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. शाळेतून दुसरी वस बोलावून विद्यार्थ्यांना सुखरूप घर पोहोच केले. घटना घडल्यानंतर विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत दिसून आले. दोन क्रेनच्या साहाय्याने बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली.

Web Title: School bus in pit Twenty students survived

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here