Home नाशिक ब्रेकिंग न्यूज! सरपंच, उपसरपंच ACBच्या जाळ्यात; ‘या’ कामासाठी मागितलेली ३० हजारांची लाच

ब्रेकिंग न्यूज! सरपंच, उपसरपंच ACBच्या जाळ्यात; ‘या’ कामासाठी मागितलेली ३० हजारांची लाच

Breaking News: पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण करून बिल काढण्यासाठी ३० हजारांची लाच (Bribe) स्वीकारताना सोग्रस येथील सरपंच व उपसरपंचास रंगेहाथ पकडण्यात आल्याची कारवाई.

Sarpanch, Deputy Sarpanch in network of ACB 30 thousand bribe

चांदवड : तालुक्यातील सोग्रस येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण करून बिल काढण्यासाठी ३० हजारांची लाच (Bribe) स्वीकारताना सोग्रस येथील सरपंच व उपसरपंचास रंगेहाथ पकडण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ठेकेदाराने सोग्रस येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र, त्याचे बिल बाकी होते. उर्वरित बिल काढण्यासाठी सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (वय ५५) व उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (वय ४५, दोघे रा. सोग्रस) यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती ३० हजार रुपये मान्य करून शुक्रवारी (दि २९) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकाऱ्यांसमोर स्वीकारले म्हणून वडनेरभैरव पोलिस ठाण्यात उशिरा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अपअधीक्षक अनिल बडगुजर, नाईक दीपक पवार, शिपाई संजय ठाकरे, नरेंद्र पवार यांच्या पथकाने केली.

Web Title: Sarpanch, Deputy Sarpanch in network of ACB 30 thousand bribe

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here