Home अकोले संगमनेर: भीषण अपघातात संकेत गोपाळे व चेतन शेटे या दोघांचा जागीच मृत्यू

संगमनेर: भीषण अपघातात संकेत गोपाळे व चेतन शेटे या दोघांचा जागीच मृत्यू

Breaking News | Accident: मोटार सायकल व कंटेनरच्या भीषण धडकेत अपघात होऊन दोघे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना.

Sanket Gopale and Chetan Shete both died on the spot in the horrific accident

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील युवक संकेत निवृत्ती गोपाळे (वय 18 ) व संकेतचे चुलत मेहुणे अकोले तालुक्यातील ढोकरी येथील चेतन बाळासाहेब शेटे यांचे मोटार सायकल व कंटेनरच्या भीषण धडकेत अपघात होऊन जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक 14 शनिवार रोजी सकाळी संकेत गोपाळे व त्याचे मेहुणे चेतन शेटे हे दोघेजण घोटी या ठिकाणी आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी गेले होते.

परंतु घोटी वरून परत येत असताना एस एम बी टी हॉस्पिटल पासून तीन किलोमीटरच्या अंतरावर त्यांचा समोरून येणाऱ्या कंटेनरला मोटर सायकलची जोराची धडक झाल्याने संकेत गोपाळे हा जागेवर ठार झाला असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले व चेतन शेटे यांना उपचारासाठी तातडीने ऍम्ब्युलन्स द्वारे हलवण्यात आले. परंतु चेतन शेटे यांचा देखील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

सदर घटनेची खबर कळताच संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील सरपंच संदीप गोपाळे व संकेत चे वडील, नातेवाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व घटनेची माहिती घेत पोलीस प्रशासनाच्या मदतीने उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह नासिक सिविल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले. या घटनेमुळे संगमनेर व अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे. उत्तरीय तपासणीनंतर चेतन शेटे, अकोले तालुक्यातील ढोकरी, व संकेत गोपाळे, संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द या ठिकाणी अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार होणार आहे.

Web Title: Sanket Gopale and Chetan Shete both died on the spot in the horrific accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here