Home संगमनेर संगमनेर: शेतीच्या वादातून एकास मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

संगमनेर: शेतीच्या वादातून एकास मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Sangamner warfare over agricultural disputes

संगमनेर | Sangamner: शेतीच्या बांधावरून गुप्तीने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागात वरुडी पठार येथे घडली आहे.

या घटनेत भाऊसाहेब यशवंत हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील देवराम खंडू फटांगरे, सुनिता देवराम फटांगरे व शंकर देवराम फटांगरे हे सामाईक बांधाजवळ पत्र्याचे शेड करण्याचे काम करीत होते. यावेळी भाऊसाहेब फटांगरे हे या तिघांना म्हणाले की, तुम्ही बांधाजवळ शेड टाकू नका. याचाच राग येऊन तिघांनी फटांगरे यांना दमदाटी व शिवीगाळ केली. लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच यातील देवराम फटांगरे याने भाऊसाहेब फटांगरे यांना गुप्तीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी भाऊसाहेब फटांगरे यांनी फिर्याद दिली असून घारगाव पोलिसांनी तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करीत आहे.

Web Title: Sangamner warfare over agricultural disputes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here