संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर मालवाहू ट्रक पलटी
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर माहुली येथील नवीन घाटात मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालवाहू ट्रक नाशिक पुणे महामार्गावर नाशिक येथून पुणेच्या दिशेने जात असताना माहुली नवीन घाटात आला असता वाहनचालकाचा ताबा सुटल्याने हा मालवाहू ट्रक पलटी झाला.
यावेळी ट्रक मधील स्पेअर पार्टचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. या घटनेची माहिती मिळताच डोळसणे महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ दिवटे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक जुन्या एकल घाटातून वळविण्यात आली. तसेच क्रेनच्या सहायाने मालवाहू ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरु होते. यावेळी मालवाहू ट्रक चालक विनोद गिरी हे बचावले.
Web Title: Sangamner truck overturns on Nashik-Pune highway