संगमनेर: घराच्या अंगणात उभ्या केलेल्या ट्रॅक्टरची चोरी
Sangamner News: साडेचार लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टरची अज्ञात चोरट्याने चोरी (Theft).
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात रात्रीच्या सुमारास घराच्या अंगणात उभ्या केलेल्या अंदाजे साडेचार लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टरची अज्ञात चोरट्याने चोरी केली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदण्यात आला आहे.
तळेगाव दिघे शिवारात जनाबाई सुंदर दिघे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच १७ सीआर ८९९६ व त्याच्यासोबत रोटर घराच्या अंगणात उभा केलेला होता. सकाळी घराच्या अंगणात ट्रॅक्टर आढळून न आल्याने दिघे कुटुंबीयांनी ट्रॅक्टरची शोधाशोध केली. मात्र, ट्रॅक्टर मिळून आला नाही. अखेर याप्रकरणी राहुल सुंदर दिघे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
Web Title: Sangamner Tractor theft from front of home
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App