Home क्राईम संगमनेरातील घटना: महिला घराच्या बाहेर कचरा टाकण्यास गेली अन

संगमनेरातील घटना: महिला घराच्या बाहेर कचरा टाकण्यास गेली अन

Sangamner theft Crime News gold

Ahmednagar News Live | संगमनेर | Sangamner Theft:  संगमनेर शहरात चोरीच्या घटना घडणे ही बाब नागरिकांसाठी नवीन राहिली नाही. पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे अशा घटना सातत्याने घडताना दिसून येत आहे. कुचकामी ठरत असलेल्या यंत्रणेचा चोरटे चांगलाच फायदा घेत आहे. अशीच घटना शहरात घडली आहे.

महिला घरातील कचरा टाकून घराकडे येत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी येऊन एका महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील गोल्डन सिटी परिसरात घडली.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, आशा चांगदेव शिंदे (वय 43, र. गोल्डन सिटी, संगमनेर) ही महिला घरातील कचरा टाकून घराकडे येत असताना मोटारसायकलवर दोन अज्ञात चोरटे याठिकाणी आले. या चोरट्यांनी सदर महिलेच्या गळ्यातील 17 ग्रॅम सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पलायन केले. सदर महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांंनी दोघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 06/2022 भारतीय दंड संहिता कलम 392, 34 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत.

Web Title: Sangamner theft Crime News gold

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here