Home संगमनेर संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर आयशर टेम्पो पलटी

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर आयशर टेम्पो पलटी

Sangamner tempo reversed on Nashik-Pune Highway Accident

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील माहुली येथे पुणे नाशिक महामार्गावर मालवाहू आयशर टेम्पो पलटी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. यामध्ये टेम्पो चालक बचावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर आयशर टेम्पो हा नांदूर खंदरमाळ शिवारात माहुली येथे आला असता दुभाजकावर जाऊन पलटी झाला. हा मालवाहू टेम्पो घारगावकडून संगमनेरच्या दिशेने जात होता. यावेळी मागे कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालक बालंबाल बचावला आहे. या अपघातात आयशर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. मागील बाजूची चाके तुटून गेली आहेत. या घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्गावरील पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. नाशिक पुणे महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे.   

Web Title: Sangamner tempo reversed on Nashik-Pune Highway Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here