संगमनेर तालुक्यात या भागांत लॉकडाऊन, २० गावांत कोरोना वाढला
संगमनेर | Sangamner: नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यातील संगमनेर आणि पारनेर या तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, झेडपी सीईंओ डॉ. राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरूवारी संगमनेर तालुक्यात भेट दिली आहे. संगमनेर तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या साकूर जिल्हा परिषद गटातील 20 गावात 31 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सरपंच यांनी घेतला आहे.
संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील 20 गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. भोसले, सीईओ क्षीरसागर यांनी भेट दिली. हा गट जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती मिरा शेटे यांचा असून त्या देखील जिल्हाधिकारी यांच्या भेटी दरम्यान, उपस्थित होत्या. या गटात करोना संसर्ग रोखण्यासाठी या जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी यांनी 8 ऑगस्टपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.
तसेच या भागातून काही मजूर जुन्नर तालुक्यात रोजगारासाठी जात असून त्यांची दररोज चाचणी करण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यांत भाजीपाला घेवून जाणार्या वाहन चालकांच्या विलगीकरणाची व्यवस्था साकूर भागात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.
Web Title: Sangamner Taluka Zp Section Lockdown