Sangamner: संगमनेर तालुक्यात आज ७ करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज ७ करोनाबाधित आढळून आले आहेत. आज प्राप्त झालेले सर्व अहवाल हे खासगी रुग्णालयातून प्राप्त झाले आहेत.
आज प्राप्त झालेल्या अहवालात निमज येथे ६१ वर्षीय पुरुष, देवगाव येथे ३४ वर्षीय पुरुष, नान्नज दुमाला येथे ४३ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे ३६ वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथे ३६ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे २३ वर्षीय पुरुष, शहरात मालदाड रोड येथे ५५ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत. अँटीजेन चाचण्या आज घेण्यात आल्या नसल्याने काही प्रमाणात बाधितांची संख्या कमी मिळून आली आहे.
संगमनेर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी कोविड १९ चे नियम पाळावेत तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन संगमनेर तालुक्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.
Web Title: Sangamner taluka Today 7 corona infected