संगमनेर तालुक्यात ४८ नवीन करोनाबाधितांची वाढ
संगमनेर: संगमनेर तालुक्यात शहरात १६ जण तर ग्रामीण भागात ३२ जण असे एकूण ४८ बाधित आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या ३३७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संगमनेर शहरात नवीन नगर रोड येथे ६५ वर्षीय महिला, रंगारगल्ली येथे २६ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ६८ वर्षीय पुरुष, उपासनी गल्ली येथे २३ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला, दिवेकर एजन्सीसमोर मालदाड रोड येथे ३१ वर्षीय महिला, गायत्री सोसायटी नवीन नगर रोड येथे ४० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, संगमनेर ५२ वर्षीय महिला, बाजारपेठ येथे ५० वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे २९,३७ वर्षीय पुरुष, वकील कॉलनी येथे ६८, १८ वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे ६० वर्षीय महिला असे १६ जण बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून राजापूर येथे ४५ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ४२,५१,३४ वर्षीय पुरुष, ७०,२९,२६ वर्षीय महिला, निंबाळे येथे २८ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ७० वर्षीय महिला, १७ वर्षीय मुलगी, ३९,४७,३२ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ४० वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरुष, घारगाव येथे ६६ वर्षीय पुरुष, डिग्रस येथे ४५ वर्षीय महिला, रायतेवाडी येथे ६४ वर्षीय महिला, जोर्वे येथे ४२ वर्षीय पुरुष, पोखरी बालेश्वर येथे १४ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथे ३१ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, निळवंडे येथे ४० वर्षीय पुरुष, नानज दुमाला येथे ५३ वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथे ५३ वर्षीय महिला, ढोलेवाडी येथे १४ वर्षीय महिला, ११ वर्षीय पुरुष, मेंढवन येथे ३१ वर्षीय पुरुष, मिरपूर येथे ३० वर्षीय महिला, पळस खेडे येथे ५३ वर्षीय पुरुष, मालदाड येथे ५९ वर्षीय पुरुष असे ३२ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka Corona Positive Report Today 48