Home संगमनेर संगमनेरमध्ये ३० नवे करोना रुग्ण बाधित, २२ कैदी करोनाबाधित

संगमनेरमध्ये ३० नवे करोना रुग्ण बाधित, २२ कैदी करोनाबाधित

Sangamner taluka Corona 30 new infected

संगमनेर(Sangamner): संगमनेर तालुक्यात आज ३० रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये तालुक्यातील आठ जण तर २२ कैद्यांचा समावेश आहे.

आज प्राप्त खासगी अहवालानुसार शहरातील पदमानगर येथे ५० वर्षीय व्यक्ती, समनापूर ३७ वर्षीय पुरुष, खराडी येथे ४० वर्षीय तरुण करोनाबाधित आढळून आला आहे.

शासकीय प्राप्त अहवालानुसार जाणता राजा मैदान परिसरात साईबन वसाहतीत एकाच कुटुंबातील २४ वर्षीय व ४८ वर्षीय महिला करोना बाधित आढळून आल्या आहेत. जोर्वे रोडवरील एकता नगर येथे ५५ व ५२ वर्षीय पुरुष, राजापूर येथे  ७५ वर्षीय जेष्ठ नागरिक करोनाबाधित आढळून आले आहेत. आज तालुक्यातील खासगी व शासकीय अहवालात एकूण आठ करोनाबाधित आढळून आले आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून धक्कादायक  उघडकीस आली आहे. संगमनेर पोलीस ठाण्यातील तब्बल  २२ कैद्यांना करोनाची लागण झाली आहे. आता कैद्यांना करोनाची लागण कशी झाली याचा तपास प्रशासन करीत आहे. काल श्रीरामपूर येथील चार कैद्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती उघडकीस आली होती. उर्वरित कैद्यांची स्त्राव तपासणी आज करण्यात येणार होती.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner taluka Corona 30 new infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here