Home संगमनेर साकुर सराफाचे दुकान लुटणाऱ्या पाच पैकी दोघांच्या मुसक्या आवळल्या

साकुर सराफाचे दुकान लुटणाऱ्या पाच पैकी दोघांच्या मुसक्या आवळल्या

Breaking News | Robbery Crime Two Arrested: पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोरांना पारनेर तालुक्यात जेरबंद करण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली.

Sangamner Sakur Robbery Crime Two Arrested

संगमनेर: साकूर येथे काल दुपारी पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोन्याच दुकानच लूटून नेल्याची घटना घडली होती. विशेषतः भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तसेच दुकानाबाहेर येऊन या दरोडेखोरांनी हवेत फायरिंग करत तेथूनच पसार झाले होते. या दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांच पथक रवाना झाले होते. दरम्यान पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोरांना पारनेर तालुक्यात जेरबंद करण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी एक दरोडेखोर बारामतीचा असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मोटारसायकल ही ताब्यात घेतल्या आहेत. उर्वरित ३ दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  साकूर येथे बसस्थानकाजवळ बाजारपेठेत सोन्या-चांदीचे व्यावसायिक निखिल सुभाष लोळगे यांचे कान्हा ज्वेलर्स हे दुकान आहे. दुकानात दुपारी दीडच्या सुमारास ग्राहक सोने खरेदी करत होते. दुकानातील कामगार जेवण करायला गेले होते. दुकानात केवळ एक कामगार होता. त्याच वेळी दोन दुचाकींवरून पाच दरोडेखोर दुकानासमोर आले. त्यातील तिघांनी थेट दुकानात घुसून कामगाराला पिस्तुलाचा धाक दाखवला. उर्वरित दोघे दरवाजात उभे राहिले. तेथे असलेल्या ग्राहकालाही बंदूक दाखवत गप्प बसण्यास भाग पाडले. दुकानाचा मालक व ग्राहकाला त्यांनी खाली बसवले. दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचा एकेकदागिना मालकासमोर काढून बॅगमध्ये भरला. सर्व दागिने बॅगमध्ये भरल्यानंतर रोख रक्कमदेखील त्यांनी काढून घेतली. मालकाचा मोबाईलही हिसकावला. हा प्रकार सुरू असताना आसपासच्या नागरिकांची या दुकानाजवळ गर्दी जमली. मात्र दरोडेखोरांपैकी एकाने पिस्तुलातून हवेत गोळाबार करीत दहशत निर्माण केली. त्यामुळे मोठी गर्दी असूनही कोणीही दरोडेखोरांना रोखण्यासाठी पुढे आले नाही. काही वेळाने बॅग घेऊन पाचही दरोडेखोर दुचाकींवर बसून सर्वांसमोरून पारनेरच्या दिशेने सुसाट निघून गेले. पुढे मांडवा फाटा येथे नागरिकांनी धाडस करून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी पुन्हा हवेत गोळीबार केला. पुढे खडकी रस्त्याला दरोडेखोरांनी दुकान मालकाचा मोबाईल फेकून दिला. पुन्हा खडकी रस्त्यावर गोळीबार (Firing) करून ते पारनेरच्या दिशेने निघून गेले.

भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, घारगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे फौजफाट्यासह साकूरमध्ये दाखल झाले. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपापल्या वाहनांतून पारनेरच्या दिशेने पाठलाग केला. दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश ओला सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांसह श्वानपथकानेही तपासाला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत पारनेर, आळेफाटा, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिस दरोडेखोरांचा माग काढत होते. घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Sangamner Sakur Robbery Crime Two Arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here