संगमनेर: पैसे दिले नाही म्हणून एकास शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण

संगमनेर | Crime: संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी येथे अंड्याचे पैसे दिले नाही म्हणून एकास शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना १७ मे रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास कुंभारवाडी येथे घडली. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बंडू दत्तू पावडे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार, दिनांक १७ मे रोजी साडे सात वाजेच्या सुमारास कुंभारवाडी येथील मारुती मंदिरासमोर शिवनाथ घाडगे याने अंड्याचे पैसे दिले नाही म्हणून मला शिवीगाळ केली. यावेळी राजू घाडगेही त्यावेळी तेथे आला असता त्यानेही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भांडणाचा आवाज ऐकून तेथे सुनील घाडगे हा हातात काठी घेऊन आला व त्याने काहीही न बोलता माझ्या हाताच्या कोपरावर काठी मारली. त्यानंतर शिवनाथ व राजू यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली असे तक्रारीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शिंदे हे करीत आहे.
Web Title: Sangamner One was abused and beaten crime filed
















































