Home संगमनेर सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव...

सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत

Sangamner Nagarpalika Election 2025: ‘संगमनेर नगरपालिका 2.0’ हे अभियान हाती घेतले असून त्यांच्या पत्नी मैथिली तांबे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी प्रबळपणे पुढे येत आहे.

Sangamner Nagarpalika Election 2025 Maithili Tambe

Sangamner Nagarpalika Election 2025: आगामी संगमनेर नगरपालिका निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला असून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे आता सक्रिय झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  यांचे भाचे असलेल्या तांबे यांनी ‘संगमनेर नगरपालिका 2.0’ हे अभियान हाती घेतले असून त्यांच्या पत्नी मैथिली तांबे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी प्रबळपणे पुढे येत आहे.

 

सत्यजित तांबे यांनी शहराच्या पुढील 50 वर्षे विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांकडून थेट सूचना मागवण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी विशेष QR कोडद्वारे जाहीरनाम्यासाठी कल्पना व सूचना नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तांबे काँग्रेसमधून निलंबित असल्याने यंदा महाविकास आघाडीऐवजी ‘शहर विकास आघाडी’ या नव्या समूहाच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत चिन्हाऐवजी नवीन निवडणूक चिन्ह घेऊन तांबे आणि त्यांची टीम रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळीही बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाण्याची तयारी असल्याने महाविकास आघाडीतील सहयोगी पक्ष शिवसेना (उबाठा गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा या निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण देत त्या निवडणुकीत झालेल्या चुका आम्ही दुरुस्त केल्या असून आता आम्ही पुढे आलो आहोत,” असे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले आहे. तांबे दाम्पत्याच्या सक्रियतेमुळे आणि नव्या राजकीय समीकरणांमुळे संगमनेर नगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

तर दुसरीकडे महायुतीने संगमनेरची निवडणूक एकत्र लढविण्याची तयारी सुरू केलीय. सुजय विखे व राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा घेत एकत्रित निवडणूक लढविण्याचे संकेत दिले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वात लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. विधानसभेप्रमाणेच नगरपालिकेत देखील जनता परिवर्तन करणार, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त करताना विधानसभेत ते गाफिल राहिल्याचं आज सांगतात. मात्र पुन्हा एकदा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे संगमनेर नगरपालिकेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या सत्तेला यंदा विखे पिता-पुत्रांच्या साथीने महायुती सुरुंग लावणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Breaking News: Sangamner Nagarpalika Election 2025 Maithili Tambe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here