Home संगमनेर संगमनेरातील घटना: आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्ष कारावास

संगमनेरातील घटना: आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्ष कारावास

Sangamner Man jailed for 10 years for sexually abusing eight-year-old girl

Ahmednagar News | Sangamner | संगमनेर: पैशाचे आमिष दाखवून ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (sexually abusing) करणाऱ्या ६३ वर्षीय व्यक्तीला १० वर्षाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर कदम यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

महादू कृष्णा ढेरंगे वय ६३ रा. आंबी दुमाला ता. संगमनेर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २०१८ साली ही घटना घडली होती. ही मुलगी व आई वडील आणि भावासमवेत तालुक्याच्या पठार भागात राहत असताना संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी येत होती. त्यावेळी ढेरंगे याने तिला शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. हा प्रकार एका स्थानिक व्यक्तीने पहिला. त्या व्यक्तीने याबाबत तिच्या आई वडिलांना सांगितला. असा काही प्रकार घडला आहे आहे का असे आई वडिलांनी मुलीला विचारले असता मी शाळेतून घरी येत असताना ढेरंगे बाबा हा शेळ्या चारत होता. त्याने मला पैसे देऊन शेतात नेले व अत्याचार केले असे तिने आई वडिलांना सांगितले. पिडीत मुलीच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात महादू ढेरंगे याच्या विरोधात फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक अन्सार इनामदार यानी तपास करीत दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधीश आरोपी ढेरंगे याला १० वर्षाचा कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.  

Web Title: Sangamner Man jailed for 10 years for sexually abusing eight-year-old girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here