संगमनेर तालुक्यात तरुणावर बिबट्याचा हल्ला
Breaking News | Sangamner: शेतात चारा कापत असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेतात चारा कापत असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. हा मुलगा मोठ्याने ओरडल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने तासाभरात घटनास्थळी पिंजरा लावला.
सोमवारी (दि. १७) दुपारी वाजेच्या सुमारास ईश्वर सूर्यभान जोशी (वय १६) हा तरुण मका कापण्यासाठी शेतात गेला होता. यावेळी शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ईश्वरवर हल्ला केला.
दरम्यान, सोमवारीच संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे शेतात बांधलेल्या गायीवर भर दुपारी बिबट्याने हल्ला केल्याने ती जखमी झाली. घारगाव परिसरात शेळकेवाडी रस्त्यालगत धोंडीराम काकडे यांचे शेत आहे. सोमवारी दुपारी काकडे यांच्या एका गायीवर बिबट्याने हल्ला केला.
Breaking News: Sangamner Leopard attacks youth
















































