संगमनेर: तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
Breaking news | Sangamner Crime: ‘तू चोरी केली आहेस, तू चोर आहेस’ असे म्हणून ओळखीच्या सात जणांनी आणि पाच ते सहा अनोळखी इसमांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना.
संगमनेर: तालुक्याच्या पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या केळेवाडी फाटा येथे ‘तू चोरी केली आहेस, तू चोर आहेस’ असे म्हणून ओळखीच्या सात जणांनी आणि पाच ते सहा अनोळखी इसमांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दीपक हौशीराम पवार (वय ३०) हा केळेवाडी फाटा येथे गेला होता. त्यावेळी ‘तू चोरी केली आहेस, तू चोर आहेस’ असे म्हणून तेरा जणांनी सदरा ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दांडक्याने पाठीवर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी दीपक पवार याने घारगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ओळखीचे सात व इतर पाच ते सहा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Sangamner Crime young man was beaten with kicks
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study