Home क्राईम प्रेत घरात पडले असून घातपात झाल्याची खोटी माहिती  पोलिसांना दिल्याने संगमनेरातील एकावर...

प्रेत घरात पडले असून घातपात झाल्याची खोटी माहिती  पोलिसांना दिल्याने संगमनेरातील एकावर गुन्हा

Sangamner crime was committed against one of them in Sangamner

Ahmednagar News Live | Sangamner | संगमनेर : एका वृद्ध व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झालेला असताना एका बहाद्धाराने पोलीस कंट्रोल रूमला खोटा फोन करून घातपात झाला असल्याची माहिती दिल्याने त्याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी बापू यादव रा. कौठे कमळेश्वर ता. संगमनेर असे या  गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर पोलीस कंट्रोलला फोन करून शिवाजी यादव याने संतू लक्षमण यादव यांचे प्रेत घरात पडलेले असून त्याच्या घातपात झाला असल्याची माहिती पोलिसांना कळविली.  त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी वस्तूस्थिती पाहण्यास पाठविण्यात आले. पेट्रोलिंग करणारे पोलीस घटनास्थळी पोहोचले असता संतू लक्षम यादव यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मात्र त्यांचा मृत्यू नैसर्गिक रीत्या झाला असल्याचे नातेवाईक यांनी सांगितले. ते वयोवृद्ध असल्याने त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली.  सायंकाळी त्यांना दुध पाजत असताना त्यांचा मृत्यू झाला.

तरीही पोलिसांनी खात्री करण्यासाठी शिवाजी बापू यांच्याकडे पुन्हा विचारपूस केली असता आमचे शेतीचे वाटप अद्याप झालेले नाही. त्याचा घातपात झाला असावा. त्यांचे पीएम करायला पाहिजे असे त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत पी एम रिपोर्ट तयार करण्यात आले. या रिपोर्टमध्ये वृद्धापकाळाने नैसर्गिक मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे संतू यादव यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला असल्याची खात्री झाली.

याप्रकरणी पोलिसांची दिशाभूल करून पोलिसांना विनाकारण कामाला लावत पोलिसांचा वेळ वाया घातल्याने तसेच पोलिसांना त्रास दिल्याबद्दल शिवाजी बापू यादव या व्यक्तीने पोलिसांना खोटी माहिती दिल्याबद्दल त्याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Sangamner crime was committed against one of them in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here