संगमनेर: वाळूचोरी करणारा ट्रॅक्टर पकडला, शासकीय वाळू मिळत नसल्याने अवैधरित्या वाळूची वाहतूक
Sangamner Crime: अंभोरे गावच्या शिवारात जाखुरी ते अंभोरे रस्त्यावरून अवैधरित्या वाळूची (Sand) वाहतूक करताना ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडल्याची कारवाई.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावच्या शिवारात जाखुरी ते अंभोरे रस्त्यावरून अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडल्याची कारवाई मंगळवार दि. 27 जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास केली आहे. एकूण 3 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. तर महसूल विभागासह पोलिसांच्या एकामागून एक कारवाया सुरू असूनही अवैधरित्या मुरूम व वाळूची वाहतूक थांबत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शासकीय वाळूची केवळ घोषणा आणि कागदावरच असल्याने बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने अवैधरित्या वाळूची वाहतूक करतानाचे घटना समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम रमेश गुंजाळ वय (23 वर्षे) रा.कोळवाडे हा ट्रॅक्टर क्रमांक (एमएच 17 के. 297) मधून एक ब्रास वाळूची बेकायदेशीर अवैध वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यामुळे पोलिसांनी हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अंभोरे गावच्या शिवारात जाखुरी ते अंभोरे रस्त्यावर पकडला आहे. एकूण 3 लाख 3 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय बडे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी शुभम गुंजाळ याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 409/ 2023 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तालुका पोलीस करत आहे.
Web Title: Sangamner Crime sand stealing tractor was caught
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App